हैदराबाद टेस्टमध्ये भारताचे 178 रन्स

November 13, 2010 3:24 PM0 commentsViews: 1

13 नोव्हेंबर

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या दुसर्‍या टेस्टवर मजबूत पकड बसवायची संधी भारतीय टीमकडे आहे. दुसर्‍या दिवस अखेर पहिल्या इनिंगमध्ये टीम 172 रन्सनी पिछाडीवर आहे.

पण भारताच्या 8 विकेट अजून बाकी आहेत. विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने भारताला आज दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी 160 रन्सची ओपनिंग टीमला करुन दिली.

चारच्या रनरेटने ही सुरुवात झाली.सेहवागने आक्रमक खेळीकरत एक सिक्स आणि चौदा फोर मारत त्याने 96 रन केले. पण त्याची 23वी सेंच्युरी मात्र आज हुकली.

व्हिटोरीला लागोपाठ दुसरी फोर मारण्याच्या नादात तो क्लीनबोल्ड झाला. गंभीरलाही आज फॉर्म गवसला आणि त्याने 54 रन केले.

दोघं आऊट झाल्यावर राहुल आणि सचिनने उरलेला वेळ खेळून काढला. सचिन अकरा रन्सवर खेळत आहे.त्यापूर्वी आज सकाळी न्यूझीलंडची पहिली इनिंग 350 रन्समध्येच संपुष्टात आली.

कालच्या स्कोअरमध्ये त्यांनी फक्त 92 रन्सची भर घातली. झहीरने आणि हरभजननने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.

close