नियम डावलून राजा यांनी टू जी स्पेक्ट्रमच वाटप केले- माथूर

November 13, 2010 5:01 PM0 commentsViews: 4

13 नोव्हेंबर

दूरसंचार मंत्री ए राजा यांच्या 2 स्पेक्ट्रम घोटाळ्याचा वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

राजा यांनी सर्व निकष धाब्यावर बसवून 2 जी स्पेक्ट्रमचे वाटप केल्याचा आरोप माजी दूरसंचार सचिव डी. एस. माथूर यांनी केला.

असं करण्यासाठी राजा यांनी आपल्यावर दबाव आणला होता, पण आपण त्यांना नकार दिला, असा दावा माथूर यांनी केला.

आपण रिटायर झाल्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाच्या फाईल्स क्लीअर झाल्याचा दावा त्यांनी केला. राजा यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहे.

2 जी स्पेक्ट्रम वाटपासाठी ज्या बैठका झाल्या. त्यावेळी माथूरसुद्धा हजर होते, असं राजा यांनी म्हटले.

close