डिझेल भेसळ प्रकरणी खासदार पुत्र आणि खासदाराला अटक

November 14, 2010 11:23 AM0 commentsViews: 14

14 नोव्हेंबर

अहमदनगरचे माजी खासदार तुकाराम गडाख यांचा मुलगा रविराज तुकाराम गडाख याला डिझेलमध्ये भेसळ करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

रविराजला पोलिसांनी घटनास्थळी अटक केली. खासदार तुकाराम गडाख यांना सरकारी कामात दखल देणे, आणि अडथळा आणणे यासाठी 12 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली.

तर त्यांचे सुपुत्र रविराज गडाख यांला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

याचवेळी इथे पोहोचलेल्या तुकाराम गडाख यांनी रविराजला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे पळवून नेण्याच्या आरोपावरुन तुकाराम गडाख यांनाही अटक केली आहे. अहमदनगरमधल्या अमळनेर इथून बीड जिल्ह्यातल्या अष्टी तालुक्यात रॉकेलनं भरलेला ट्रक निघाला होता.

पण तो तिथे न जाता पांढरीचा पुल इथल्या रविंद्र हायवे सर्विस या पेट्रोल पंपावर पोहचला. तिथे या ट्रक मधल्या डिझेलमध्ये हे रॉकेल मिसळण्यात येत होते.

या ट्रकमधून चार हजार लिटर रॉकेल डिझेलच्या टाकीत टाकण्यात आले. दरम्यान सर्व रॉकेल ,डिझेलचे सँपल घेऊन पेट्रोल पंप सील करण्यतात आला आहे.

close