एशियन गेम्समध्ये भारताला गोल्ड

November 14, 2010 12:05 PM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर

आशियाई स्पर्धेत भारताचे गोल्ड मेडलचे खाते अखेर उघडले आहेत.

भारताच्या पंकज अडवाणीने पुरूषांच्या इंग्लिंश बिलियर्ड्स सिंगल्स प्रकारात गोल्ड मेडल पटकावले आहे.

फायनलमध्ये पंकजने म्यानमारच्या ओओ नेचा 3-2ने पराभव केला.

पंकजने 2006साली दोहामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही गोल्ड पटकावले होते.

पिस्टल प्रकारात ब्राँझ मेडल

भारताने आशियाई स्पर्धेच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात ब्राँझ मेडलने केली. शूटींगमध्ये विजय कुमारनं ब्राँझ मेडलची कमाई केली.

पुरुषांच्या 10 मीटर पिस्टल प्रकारात विजयने हे मेडल मिळवले. पात्रता फेरीत विजय कुमार 579 पॉइंट्स मिळवत आठव्या स्थानावर होता.

पण फायनलमध्ये त्याने जबरदस्त शॉर्ट्स मारत ब्राँझ पटकावले.

महिला शुटिंग टीमला सिल्व्हर मेडल

भारताच्या महिला शुटींग टीमनेही सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल टिम प्रकारात भारताच्या हिना सिद्धु, अनु राज सिंग आणि सोनिया राय यांनी सिल्व्हर मेडल जिंकले.

तिघींनी एकूण अकराशे चाळीस पॉइंट्सची कमाई केली. ही लढत खुपच अटीतटीची झाली.

गोल्ड विजेत्या नॉर्थ कोरियाच्या टीमने 1141 पॉइंट्स मिळवले. तर चीनची टीम 1139 पॉइंट्स मिळवून तिसरी आली.

याच प्रकारात सिंगल्समध्ये मात्र तिघींचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आले.

close