मंत्रिमंडळाची यादी जाहीर होण्याची शक्यता

November 14, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

14 नोव्हेंबर

मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या दिल्लीत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याशिवाय दिल्लीत गेलेल्या काँग्रेसच्या आमदारांच्याही ते भेटी घेत आहेत.

आज सलग दुसर्‍या दिवशी त्यांचा हा भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता.आज संध्याकाळपर्यंत मंत्र्यांची नावं फायनल होण्याची शक्यता आहे.

आज नविन मंत्र्यांची नाव फायनल झाली तर उद्या नविन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

दरम्यान, मंत्रीपदासाठी दिल्लीमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नेतेही दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.

close