अंधश्रद्धेपोटी मुलाने आईचाच मृतदेह देव्हार्‍याखाली पुरला

November 14, 2010 3:41 PM0 commentsViews:

14 नोव्हेंबर

अंधश्रद्धेतून स्वत: च्या आईला घरामध्ये पुरल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील घुडेवाडी इथं उघडकीला आली.

नैसर्गिक मृत्यु झाल्यानंतर बाबुराव बुगडे यांनी आपल्याच आईचा मृतदेह राहत्या घरी देव्हार्‍याजवळ पुरुन ठेवला होता.

तब्बल पाच दिवसांनतर हा प्रकार उघडकीस आला. आपल्याला दृष्टांत होऊन त्याप्रमाणे हा मृतदेह पुरल्याचे आरोपीचे म्हणणे आहे.

पण पैशाच्या लोभापोटी हा प्रकार घडला असावा अशी चर्चा आहे. पण शवविच्छेदन अहवालात त्यांच्या आईचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

close