सरकारविरुद्ध राग नाही – आंग सान सू की

November 14, 2010 4:37 PM0 commentsViews: 2

14 नोव्हेंबर

आपल्याला सलग पंधरा वर्ष नजरकैदेत ठेवणार्‍या सरकारविरुद्ध आपल्या मनात राग नाही अशी प्रतिक्रिया म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांनी दिली.

सुटका झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपली सुटका कोणत्याही अटींवर करण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितले.

नजरकैदेत असताना आपल्याला सरकारने कोणताच त्रास दिला नाही, तसेच आता देशातील सगळ्याच लोकशाहीवादी गटांसोबत काम करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

close