सरकारने दिलेल्या घराला कृष्णामाईंचा नकार

November 15, 2010 8:32 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वेंच्या पत्नी कृष्णामाईं यांनी सरकारने दिलेल्या घराला नकार दिला आहे. मास्तर जिवंत असताना घर मिळालं नाही. आता घर घेऊन काय करू असा सवालही त्यांनी विचारला.

ज्यांना घराची गरज असेल अशांना घर द्यावे असंही त्यांनी सांगितले. युती सरकारच्या काळात नारायण सुर्व्यांना घर मंजूर झाले होते.

तुम्ही कवी असल्याचे सिध्द करा असं पत्र त्यांना सरकारकडून मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या मास्तरांनी पुढे घरासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही.

नंतर नाशिक महापालिकेने त्यांना घरं देण्याचे कबूल केले. मात्र, पालिकेने घराच्या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या.

नारायण सुर्व्यांच्या शेवटच्या आजारपणात सरकारकडून घरं देण्याच आश्वासन देण्यात आले होते. पण ते घर मिळण्याआधीच नारायण सुर्वेंचं निधन झाले.

मास्तर जिवंत असताना घर मिळालं असतं तर बरं झालं असत अशी खंतही कृष्णामाईंनी व्यक्त केली.

close