चंद्रपूरचे दादाजी खोब्रागडें यांचा फोर्ब्जच्या यादीत समावेश

November 15, 2010 7:41 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

फोर्ब्सच्या भारतातील प्रमुख शक्तिशाली ग्रामीण उद्योजकांच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील दादाजी रामजी खोब्रागडे यांचा समावेश करण्यात आला.

खोब्रागडे यांनी एच.एम.टी तांदूळ विकसित केला. तांदळाची ही जात पारंपरिक तांदळापेक्षा 80 टक्के जास्त उत्पादन देत. पाच राज्यातील 1 लाख एकरवर आज एचएमटीची लागवड केली जाते.

याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना झाला. फोर्ब्सच्या या यादीत तिसरा क्रमांक फ्युचर ग्रुपचे अध्यक्ष किशोर बियानी यांनी पटकावला आहे.

रिटेल किंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या बियानी यांच्या कंपनीची देशभरातल्या 25 शहरांत दुकान आहेत. सामाजिक उद्योजक अंशु गुप्ता यांनाही फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे.

श्रीमंत व्यक्तींकडून त्यांनी वापरलेले कपडे गोळा करुन ते गरिबांना देण्याचे काम गुप्ता करतात. त्यांच्या या सामाजिक जाणिवेची दखल फोर्ब्सन घेतली.

याबरोबरच मोटर सायकल ट्रॅक्टर विकसित करणार्‍या मनसुखभाई जगानी, मनसुखभाई पटेल, मनसुखभाई प्रजापती, आणि मदनलाल कुमावत या ग्रामीण उद्योजकांची नावं समाविष्ट करण्यात आली आहे.

close