टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी संसदेत गदारोळ

November 15, 2010 11:08 AM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.

डीएमकेचे ए राजा यांनी याप्रकरणी रविवारी राजीनामा दिला. पण फक्त राजीनामा देऊन भागणार नाही तर कारवाईही हवी अशी विरोधकांची मागणी आहे.

त्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची आणि त्याद्वारे या प्रकरणाची चौकशी मागणी विरोधकांनी केली.

मात्र काहीही झाले तरी या प्रकरणी संसदीय समितीची स्थापना करणार नाही, असं काँग्रेसने स्पष्ट केले.

close