औरंगाबादमध्ये एस टी शहर बससेवाला मनसेचा विरोध

November 15, 2010 7:43 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

 

सुमारे दीड महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबादची शहर बससेवा एस टी महामंडळान सुरू केली. पण एएमटीच्या सेवतील चारशे कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी बसच्या पहिल्याच फेरीला मनसेच्या आंदोलनाला सांमोर जावे लागले.

 

मनसेन जोरदार घोषणाबाजी करीत बस अडवून धरल्या. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्तांना अटक करून बससेवेला सुरूवात केली. कर्मचार्‍यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली.

 

महानगरपालिकेची शहरबससेवा बंद पडल्यानंतर आता एसटीने शहरबस सेवा सुरू केली. एएमटीच्या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बस अडवून धरल्या.

 

पोलिसांनी वारंवार विनंती करूनही कार्यकर्त्यांनी त्यांना दाद दिली नाही. प्रचंड घोषणाबाजी करीत एएमटीच्या कर्चचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली.

close