औरंगाबादमध्ये कोबंड्यांची झुंज

November 15, 2010 7:50 AM0 commentsViews: 16

15 नोव्हेंबर

पशु-पक्ष्यांची झुंज लावण्यास कायद्याने बंदी असली तरी अनेक गावात या स्पर्धा बिनधास्तपणे भरविल्या जातात.

औरंगाबादमध्ये अशीच कोबंड्यांची झुंज लावण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राज्यातील वेगवेगळया भागातील तगडे कोंबडे आले होते.

या स्पर्धेचे नियंम सोपे आहेत. पंधरा मिनिटांची वेळ दोन कोंबड्यांना दिला जातो. त्यात ते एकमेकांना चोच मारून जखमी करण्याचा प्रयत्न करतात.

या वेळेत जो कोंबडा निघून जातो तो हरतो. दोन्ही कोंबडे लढत राहिले तर पंधरा मिनिटांचा वेळ वाढवून दिला जातो.पण स्पर्धेत सहभागी कोंबड्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते.

close