नागपूरात कॅशीयरवर गोळीबार करून 15 लाख लूटले

November 15, 2010 7:35 AM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

नागपूरच्या गिट्टीखदानमधल्या अवस्थीनगर इथ ब्रायलर कंपनीच्या कॅशीयरवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार करून 15 लाखाची रक्कम लूटली. काल रात्री ही घटना घडली.

कॅ शीयर काम आटोपून व्यवस्थापकाकडे पैसे जमा करायला जात असतांना काही अज्ञात लोकांनी कॅशीयरचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर देशी कट्यांने गोळीबार केला.

विशेष म्हणजे घटनास्थळाजवळच पोलिस आणि सीबीआयचे मुख्यालय आहे. या गोळीबारात कॅशीयर नईम गंभीर जखमी झाला.

नईम च्या कानाला आणि छातीला गोळी लागली आहे. गेल्या काही दिवसांमधली ही दुसरी मोठी घटना असल्याने नागपूमध्ये खळबळ उडाली.

close