कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

November 15, 2010 1:20 PM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

 

कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने अखेर टी एस दरबारी आणि संजय महेंद्र यांना अटक केली आहे.

 

आज सकाळी दरबारी तसेच संजय महेंद्रू यांच्या घरांवर आणि कॉमनवेल्थ स्पर्धेच्या ऑफिसवर सीबीआयने धाड घातली होती.

 

त्यानंतर दोघांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर अखेर संध्याकाळी दोघांना अटक झाली.

 

त्याचबरोबर कॉमनवेल्थ बॅटन रिले कार्यक्रमा दरम्यान झालेल्या घोटाळ्याची चौकशीही सीबीआयने सुरु केली आहे. आणि इंग्लंडच्या ए एम फिल्म्स कंपनीविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close