रतन टाटांकडे लाच मागितली होती

November 15, 2010 2:36 PM0 commentsViews: 1

15 नोव्हेंबर

एकीकडे मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार गाजत असतानाच आता देशातील अग्रगण्य उद्योगपती रतन टाटा यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

90 च्या दशकात एका केंद्रीय मंत्र्याने एअरलाइन्स सुरू करण्यासाठी आपल्याकडे 15 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप रतन टाटा यांनी केला.

टाटांनी काही वर्षांपूर्वी देशांतर्गत एअरलाइन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठीच्या परवानगीसाठी संबंधित मंत्र्यांनी ही लाच मागितली होती असा गौप्यस्फोट टाटांनी केला आहे.

पण लाच देणे हे आपल्या तत्वांमध्ये बसत नसल्याने आपण एअरलाइन्स तयार करण्याचा निर्णयच रद्द केला अस टाटांनी स्पष्ट केले.

close