आदर्श प्रकरणी गुन्हा दाखल

November 15, 2010 3:00 PM0 commentsViews: 7

15 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर विनापरवानगी बांधकाम केल्याची तक्रार होती.

सैनिक कल्याणासाठी आदर्शने कुठलीही तरतुद केली नसल्याचीही तक्रार दाखल करण्यात आली होती.

सीबीआयने या निष्कर्षांच्या आधारावर गुन्हा दाखल

1. आदर्श सोसायटीची जागा लष्कराची असल्याचे नमूद करण्यात आले आहे

2. तसेच सोसायटीच्या बांधकामासाठी पर्यावरणाची मंजुरी घेण्यात आलेली नाही, असाही निष्कर्ष काढण्यात आला

3. जागा नेमकी कोणाची हे तपासून पाहण्यासाठी सीबीआयने ब्रिटीश गॅझेटियरचा आधार घेतला.

1847 च्या नकाशामध्ये ही जागा लष्कराच्या ताब्यात कुलाबा डिफेन्स लँडनावाने असल्याचे आढळून आले

4. राज्य सरकारने खरे तर या जागेचा सर्व्हे करणे आवश्यक होते.

पण आदर्श सोसायटीला जमीन देतेवेळीसच महसूल विभागाकडून सर्व्हे करण्यात आल्याचे उघडकीस आले

5. तसेच कारगिलमध्ये शौर्य बजावणार्‍या आणि शहिदांच्या नातेवाईकांना फ्लॅट्स देण्याची शक्कल प्रमोटर्सनी लढवल्याचाहीठपका सीबीआयने ठेवला

6. याखेरीज राज्य सरकारने गेल्या 9 नोव्हेंबरला सादर केलेल्याअहवालानुसार आदर्श सोसायटीच्या बांधकामात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले

7. तसेच पर्यावरणाची मंजुरी घेण्यात आलेली नाही, असे नमुद करण्यात आले

या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे.

close