आशियाई स्पर्धेत भारताला तिसरे ब्राँझ मेडल

November 15, 2010 4:55 PM0 commentsViews: 2

15 नोव्हेंबर

भारताच्या पुरूषांच्या टेनिस टीमला ब्राँझ मेडलवर समाधान मानावे लागले.

सेमी फायनलमध्ये भारतीय टीमला चीन-तैपेई टीमकडून पराभव पत्करावा लागला पुरुषांच्या एकेरीत पहिली मॅच खेळणार्‍या समन सिंगला पराभव पत्करावा लागला.

दुसर्‍या एकेरीत सोमदेव देव बर्मननं विजय मिळवत भारताला 1-1 अशी बरोबर साधून दिली. पण डबल्समध्ये मात्र भारताला पराभव पत्करावा लागला.

चीन-तैपेईच्या जोडीने भारताच्या सनम-सोमदेव जोडीचा पहिल्या सेटमध्ये 6-4 असा सहज पराभव केला.

दुसर्‍या सेटमध्ये भारतीय जोडीने चांगली लढत दिली. पण हा सेटही चीन-तैपेईनं 7-6 असा जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.

नेमबाजांनी केली निराशा

एशियन गेम्समध्ये आजच्या तिसर्‍या दिवशी भारतीय नेमबाजांना एकही मेडल मिळवता आलेले नाही. आज आठ गोल्ड मेडल्स पणाला लागली होती.

पण आजही स्पर्धेवर चीन आणि दक्षिण कोरियाच्या नेमबाजांचे वर्चस्व दिसत आहे. दोघांनी तीन – तीन गोल्ड पटाकावली आहे.

गगन नारंग, विजय कुमार, तेजस्विनी या भारताच्या अनुभवी नेमबाजांनी मात्र आज निराशा केली. पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन टीम प्रकारात गगन नारंग, हरिओम सिंग आणि सुरेंद्र राठोड यांची जोडी पाचवी आली.

तिघांना अठराशे पैकी 1763 पॉइंट्स मिळवता आले. अव्वल आलेल्या चीनच्या जोडीने त्यांच्यापेक्षा 22 पॉइंट्स जास्त मिळवले. याच प्रकारात सिंगल्समध्ये एकही नेमबाज फायनलसाठी पात्र ठरला नाही.

तेजस्विनी सावंतचा खराब फॉर्मही अजून सुरुच आहे. पन्नास मीटर रायफल प्रोनमध्ये ती अकरावी आली. शिवाय टीम प्रकारातही तिच्याबरोबर लज्जा गोस्वामी आणि मीना यांची कामगिरी साधारण होती.

आणि भारतीय टीमला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

close