मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

November 15, 2010 5:21 PM0 commentsViews: 6

15 नोव्हेंबर

राज्यात सध्या अवकाळी पावसाचा फटका सगळ्यांनाच बसत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही आज जोरदार पाऊस झाला आहे.

ठाणे-वाशी रेल्वे मार्गावर कोपरखैरणे इथं ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने रेल्वे वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती.

आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. ऐन संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने घरी परतणार्‍या मुंबईकरांचे मोठे हाल झाले.

दरम्यान येत्या 48 तासात अजून पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच लक्षद्वीप ते कोकण या दरम्यान निर्माण जालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे येत्या 48 तासात ढगांच्या गडगटासह राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

close