कणकवलीत तापाचे आठ बळी

November 16, 2010 10:34 AM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर

गेल्या महिन्याभरापासून सिंधुदुर्गातला कणकवली तालुका लेप्टो स्पायरेसीस या जीवघेण्या तापाच्या विळख्यात सापडला. या तापाने आतापर्यंत आठ जणांचा बळी घेतला आहे.

खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतांनाही आणखी काहीजण दगावल्याची भिती आहे.जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये लेप्टोस्पायरेसीसचे 34 रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.

मात्र अजूनही या उपचारासाठी आवश्यक असलेली प्लेटलेट सेपरेटर यंत्रणा कार्यरत झालेली नाही. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिरजेतील तीन तज्ञ डॉक्टरांचे पथक आज कणकवलीत दाखल होणार आहे.

close