अवकाळी पावसांने झालेल्या नुकसान भरपाईचा निर्णय मंत्रीमंडळ घेणार

November 16, 2010 10:39 AM0 commentsViews: 5

16 नोव्हेंबर

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात ठिकठिकाणी आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

द्राक्षं, सोयाबिन, कांदा, कापूस, ज्वारी आणि धान पिकाला याचा फटका बसला. पावसामुळे ज्वारी काळी पडली तर वेचणीस आलेल्या कापूस ओला झाल्याने त्याचा भाव कमी होतो. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला.

दरम्यान, या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. त्यानुसार मुख्य सचिव जे पी डांगे यांनी विभागीय आयुक्त आणि पालक सचिवांना नुकसानग्रस्त जिल्ह्यात पाठवले आहे.

जिल्हा यंत्रणेने शेतात जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे. येत्या दोन दिवसात नुकसानीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे नुकसान भरपाईचा निर्णय मंत्रीमंडळ घेणार आहे.

close