आदर्श प्रकरणी सीबीआय पथक मंत्रांलयात

November 16, 2010 12:31 PM0 commentsViews: 6

16 नोव्हेंबर

आदर्श घोटाळाप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक आज मंत्रांलयात धडकले. या प्रकरणी सीबीआयने वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माजी अधिकार्‍यांची चौकशी सुरू केली.

मंत्रालयात जाऊन सीबीआयने पश्चिम विभागाचे सहसंचालक रिषीराज सिंह यांच्या तीन सदस्यीय पथकाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांची भेट घेतली.

त्यांच्याकडून आदर्शची मूळ फाईल तसेच काही महत्त्वाची कागदपत्र घेतली. त्याच वेळी, या प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्य सचिवांनी स्पष्ट केले.

close