सणासुदीच्या मोसमात फूड इंडस्ट्रीत तेजी

October 30, 2008 11:49 AM0 commentsViews: 14

30 ऑक्टोबर, दिल्लीरीना भारद्वाजदेशातील अनेक उद्योगांना मंदीचा फटका बसला आहे मात्र फास्ट फूड इंडस्ट्रीसारखे काही सेक्टर्स अजुनही तेजीत आहेत. सणासुदीच्या दिवसांचा सर्वात जास्त फायदा होतोय तो फास्ट फूड इंडस्ट्रीला. दिवाळीच्या दिवसात सगळीकडेच ताव मारला जातोय तो खाण्यापिण्याच्या पदार्थांवर. म्हणूनच दिवाळीनिमित्त फायदा घेण्यासाठी फास्ट फूड रिटेल चेन ' पिझ्झा हट ' नं खास ' मॅजिक टाईम्स दिवाळी ' ग्राहकांसाठी आणलीय. पण फक्त सणच नाही तर यामागे महागाईचाही विचार केल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळेच ' पिझ्झा हट 'नं फक्त 99 रुपयांचा पिझ्झा आणला आहे. या नव्या ऑफरमुळे दिवाळीत विक्री 15 टक्क्यांनी वाढेल अशी कंपनीची अपेक्षा आहे.' पिझ्झा हट ' नं अशी ऑफर आणल्यानंतर मार्केटमधले इतर प्रतिस्पर्धी तरी कसे मागे राहणार. त्यामुळे डॉमिनोजनंदेखील पिझ्झा मॅनिया ऑफरवर 10 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑफर्समध्ये केवळ 35 रुपयात पिझ्झा मिळू शकेल. डॉमिनोजनं त्यांचं मार्केटिंग बजेटही वाढवून यावर्षी 20 कोटी रुपये केलं आहे. डॉमिनोजनं मार्केटिंग स्ट्रॅटेजीत बदल केले आहेत. आता ' हंग्री क्या ' ऐवजी त्यांची टॅगलाईन असेल ' खुशियों की होम डिलीव्हरी. 'देशातली सुमारे 25 कोटी रुपयांची फास्ट फूड इंडस्ट्री दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढत आहे आणि हा सप्टेंबर ते ऑक्टोबरचा सणांचा सिझन तर विक्री वाढवण्याच्यादृष्टीनं फास्ट फूड कंपन्यांसाठी सुगीचा काळ असतो अर्थातच त्याचा पूरेपूर फायदा उठवण्यास फूड इंडस्ट्री सज्जं झाली आहे.

close