पवईत बलात्कार प्रकरणी अरुण बोरुडे आरोपी

November 16, 2010 2:53 PM0 commentsViews: 1

अजित मांढरे, मुंबई

16 नोव्हेंबर

पवईत घडलेल्या बलात्कार प्रकरणात सिनीअर पी आय अरुण बोरुडे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबई पोलीसांनी दोन आरोपींना माझगांव कोर्टात हजर केले आहे.

याआधी पोलीसांनी फक्त शांताबाई गायकवाड या महिलेला अटक केली होती. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन मुंबई पोलीसांनी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

पवईत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे सिनिअर पी आय अरुण बोरुडे यांचा सहभाग आहे का ? त्यांनी त्या मुलीवर बलात्कार केलाय का ? बोरुडे यांच नाव प्रकरणात येऊन सुद्धा पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाही ? या सर्व प्रश्नांना आता पुर्ण विराम लागला आहे.

कारण पवईत बलात्कार प्रकरणात सिनीअर पी आय अरुण बोरुडे यांनाच आरोपी करण्यात आले आहे.

शांताबाई गायकवाड हिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पवई पोलीसांनी मोहनचंद श्याम आणि चंद्रभान गुप्ता या दोघांना अटक करुन माझगाव कोर्टात हजर केले. या दोघांना माझगाव कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली आहे.

close