गोवंडीत हॉस्पीटलच्या हद्दीतून मूल पळवले

November 16, 2010 7:32 AM0 commentsViews: 2

16 नोव्हेंबर

गोवंडीतल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमधून मूल पळवल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये औषधासाठी मुन्नी खातू आपल्या तीन मुलांसोबत गेली होती.

त्यावेळी तिने आपले दोन महिन्याचे तान्हं बाळ मोठ्या मुलाजवळ दिले आणि ती औषध घ्यायला गेली. तितक्यात एका बुरखाधारी महिलेने ते मुल पळवले.

त्या महिलेने बुरखा घातला असल्यामुळे तिचा चेहरा कुणीच पाहिला नाही. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सध्या तरी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close