शपथविधी गुरूवारी होण्याची शक्यता

November 16, 2010 5:40 PM0 commentsViews: 1

16 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी गुरूवारी होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिले आहे.

काँग्रेसची यादी जवळपास पूर्ण झाली असून उद्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळावरचर्चा केली जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो याची सगळेच जण वाट बघत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची याबद्दल आज महत्वाची बैठक झाली.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत आल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीत मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाल्याचे समजत आहे.

दरम्यान मंत्रीपदांच्या संख्येवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद सुरू झाला आहे. 22 – 21 फॉर्मुला हवा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

कॉंग्रेसला 23 मंत्रीपद तर राष्ट्रवादीला 21 मंत्रीपद हवी आहेत. पण कॉंग्रेस ती द्यायला तयार नाही. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी दरम्यान या प्रमुख मुद्द्‌यावरुन वाद होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान नोव्हेंबर 2009 मध्ये जो फॉर्म्युला होता त्यात बदल करण्याची कोणतीही विनंती राष्ट्रवादीने केलेली नाही.

आणि आघाडीत कुठलेही निर्णय तडकाफडकीत घेता येत नाहीत असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांनी टोला लगावला.

close