राजकारण्यांचे चौकशीचे संकेत

November 17, 2010 7:57 AM0 commentsViews:

17 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणी सीबाआयने चौकशी सुरू केल्याने सनदी अधिकारी आणि राजकारण्यांचे धावे दणाणले आहेत.

सीबीआयची सध्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. गरज पडल्यास संबंधीत सनदी, लष्करी आणि इतर अधिकारी आणि राजकारण्यांची चौकशी करण्याचे संकेतही सीबीआयने दिले आहे.

आदर्श घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक काल मंत्रालयात धडकले होते. या प्रकरणी सीबीआयने वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माजी अधिकार्‍यांची चौकशी सुरु केली होती.

मंत्रालयात जाऊन सीबीआय पश्चिम विभागाचे सहसंचालक रिषीराज सिंह यांच्या तीन सदस्यीय पथकाने राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे यांची भेट घेतली होती

तर दुसरीकडे राजकारण्यांनी जबाबदारी स्विकारली आता अधिकार्‍यांच काय असा सवाल आता विचारला जात असल्याने सीबीआय कुठली कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close