राज्यात बकरी ईद उत्साहात साजरी

November 17, 2010 9:09 AM0 commentsViews: 76

17 नोव्हेंबर

देशभरात आज बकरी ईद साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्ये छावणीच्या ईदगाह मैदानावर आज सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

तसेच शहरातील इतर साठ मशिदींमध्येही ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली. बकरी ईद ही त्याग आणि बलिदानाचे प्रतिक मानली जाते.

पंढरपुरात वेगळ्या पद्धतीने साजरी

यावर्षी पंढरपुरात मात्र बकरी ईद थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी होते. आज बकरी ईद आणि कार्तिकी एकादशी एकाच दिवशी असल्याने ईदनिमित्त बकर्‍याची कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपुरातल्या मुस्लीम बांधवांनी घेतला.

त्यामुळे यावर्षी कुर्बानी न देता बकरी ईद साजरी केली जाणार आहे.

चायनिज बकरे विक्रीसाठी उपलब्ध

नाशिकमध्येही बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येते आहे. बकरी ईदच्या निमित्ताने नाशिकच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

यावेळी सुमारे 50 हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. नाशिक शहर पोलिसांच्या वतीने यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बकरी ईदच्या कुर्बानीसाठी मुंबईतल्या देवनार कत्तलखान्यात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या जातीचे बकरे विक्रीसाठी आणण्यात आले आहे.

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे चायनिज बकरेही याठिकाणी विकण्यासाठी आणण्यात आले आहेत. देवनार पशुवधगृहात जवळपास 75 चायनिज बकरे विक्रीसाठी आले आहेत.

त्यांची किंमत 20 ते पन्नास हजांराच्या घरात आहे. यावर्षी एकट्या देवनारमध्ये बकरी ईदसाठी 1 लाख 40 हजार बकरे विक्रीसाठी आले असून त्यापैकी 1 लाख 37 हजार बकर्‍यंाची विक्री झालेली आहे.

यामध्ये मारवाड, काश्मीरी, मेवाड, राजस्थानी, महाराष्ट्रीयन यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे बकरे विक्रीसाठी आलेले आहेत. या बबकरी ईदच्या सणानिमित्तानं नुसत्या देवनार कत्तलखान्यातून महापालिकेला दीड कोटी रूपयांचा महसुल मिळाला आहे.

close