रियालिटी शोजवर बंदी

November 17, 2010 10:48 AM0 commentsViews: 1

17 नोव्हेंबर

बिग बॉस 4 आणि राखी का इन्साफ या दोन्ही रियालिटी शोजच्या प्रसारणावर रात्री अकरापूर्वी दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे कार्यक्रम रात्री 11 च्या नंतर दाखवण्यात यावी असा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.

"राखी का इन्साफ" हा कार्यक्रम इमॅजिन टिव्हीवर दाखवतात तर "बिग बॉस 4" हा कार्यक्रम कलर्स चॅनल्सवर दाखवण्यात येतो.

या दोन्ही ही कार्यक्रमात बिनधास्त चित्रीकरण, आणि अश्लील शब्दांचा सर्रास वापर होत होता याच मुद्दयावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे.

close