नाण्यांच पहिल म्युझियम

November 17, 2010 11:56 AM0 commentsViews: 11

प्राची कुलकर्णी, पुणे

17 नोव्हेंबर

कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा खास ओकेजन म्हणुन प्रत्येकच देशात कॉईन्स लाँच केले जातात. पण असे कॉईन्स नंतर मात्र आपल्याला पहायला मिळत नाहीत.

अशाच सगळ्या कॉईन्सचे कलेक्शन केले आहे पुण्यातल्या नरेंद्र टोळे यांनी पहिले न्युमिस्मॅटिक म्हणजेच कॉईन म्युझियम पुण्यामध्ये सुरु केले आहे.

ईंडोनेशियाच्या नोटवर असणारं गणपती बाप्पाचं चित्र .. शिवकालीन होन, अगदी काही वर्षांपुर्वी वापरात असणारा ढब्बु पैसा आणि आणे.. 786 हा आकडा असणार्‍या 4 हजारांपेक्षाही जास्त नोटा. इतकंच नाही तर चक्क सोन्याची नोट.. या सगळ्या गोष्टी पहायला मिळतायत पुण्यातल्या यशलक्ष्मी कॉईन म्युझियम मध्ये…

पुर्वीपासुन जमवलेल्या या नोटांचे आणि नाण्याचं कलेक्शन आता म्युझियमच्या स्वरुपात लोकांसमोर आले आहे.

तब्बल दोनशे वीस देशांमधले कॉईन्स आणि नोटांचे कलेक्शन इथं पहायला मिळतात.

close