पवई बलात्कार प्रकरणी अरुण बोरुडे अखेर बडतर्फ

November 17, 2010 12:25 PM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर

पवई बलात्कार प्रकरणी अखेर सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अरुण बोरुडेवर अखेर कारवाई झाली आहे.

बोरुडेला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी तसे आदेश दिले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा बोरुडेंवर आरोप आहे.

पवईत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलीस अधिकारी अरुण बोरुडेसह तीन आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

यामधील तिघांना पवई पोलीसांनी अटक केली असून हे प्रकरण आता बलात्काराबरोबरच एका मोठ्या सेक्स रॅकेटचे असल्याचे पोलीस तपासात उघड होऊ शकते.

close