विम्को काडेपेटी कारखाना अखेर बंद

November 17, 2010 12:47 PM0 commentsViews: 20

17 नोव्हेंबर

अंबरनाथ शहरातील विम्को हा भारतातील पहिला काडेपेटी तयार करण्याचा कारखाना अखेर बंद करण्यात आला.

90 वर्षे जुना कारखाना आशिया खंडातील प्रमाणित पहिला कारखाना असून जगात तिस-या क्रमांकाचा कारखाना म्हणून त्याची ओळख होती.

गेल्या 5 वर्षांत घरघर लागलेल्या या कारखान्यातील 238 कामागारांनी अखेर स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने हा कारखाना आता इतिहासजमा झाला आहे.

close