मुंबईत एक कोटी किंमतीचे चरस जप्त

November 17, 2010 3:14 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करुन मुंबई 68 किलो चरस जप्त केले आहे. या चरसची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

सफरचंदाच्या ट्रकमधून या चरसची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. काश्मिरमधून सफरचंद घेऊन येणार्‍या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या सीटखाली चरस लपवण्यासाठी जागा करण्यात आली होती.

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ खान, अब्दुल दार, चांद सय्यद आणि रेहमान शेख अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

close