चेन्नईचा मोस्ट वॉन्टेड मुंबई पोलिसांच्या अटकेत

October 30, 2008 11:56 AM0 commentsViews: 13

30 ऑक्टोबर, मुंबईचेन्नईत अडीच वर्षाच्या मुलीची क्रूरपणे हत्या करून पळालेल्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यापासून चेन्नई पोलीस या आरोपीच्या मागावर होते. चंद्रकांत उर्फ जुगनू. वय वर्षे 40. चेन्नईतला मोस्ट वॉण्टेड आरोपी होता. मागील महिन्यात जुगनूने आपल्याच मामाची मुलगी मोनी हिची हत्या केली होती. जुगनू चेन्नईतला इनामी आरोपी आहे. चेन्नई पोलिसांना महिनाभर तुरी देणार्‍या जुगनूला मुंबई पोलिसांनी काही तासातच गजाआड केलं.जुगनूच्या मोबाईल नेटवर्कमुळे तो मुंबई आल्याचं पोलिसांना कळलं त्यानंतर तत्परतेने कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्याला गजाआड पाठवलं. मुंबई पोलिसांच्या या झटपट कारवाईमुळे चेन्नई पोलिसांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

close