ट्रॅफिक पोलीस घेणार फेसबुकची मदत

November 17, 2010 4:42 PM0 commentsViews: 8

प्राची कुलकर्णी, पुणे

17 नोव्हेंबर

सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यात आता पोलीस प्रशासन ही अडकली आहे.मात्र पोलीस प्रशासन हे चांगल्या कामासाठी अडकले आहे हे विशेष.

मुंबईनंतर पुण्यातही वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस घेणार फेसबुकची मदत, बेशिस्त वाहनचालकांची माहिती फेसबुकवर देण्याचं आवाहन केले आहे.

सध्या फेसबुक, ऑर्कुट आणि ट्विटरची प्रचंड क्रेझ लोकांमध्ये आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहतूक नियमानासाठी आता फेसबुकची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नियम मोडणार्‍यांची माहिती लोकांकडून घेऊन लवकरात लवकर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनीफेसबुकर त्यांचे अधिकृत पेज सुरू केले आहे.

close