मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी

November 17, 2010 5:46 PM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या यादी बाबतचा तिढा आता सुटला आहे. अखेर उद्या (गुरुवारी) राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळाच्या यादीला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्री हायकमांडशी चर्चा करण्याकरता संध्याकाळी दिल्ली गेले होते. तिथली बैठक आता संपली आहे.

उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधीची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे. आज रात्री राष्ट्रवादीशी बोलून मंत्रिमंडळाची यादी पूर्ण करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यादरम्यान जागावाटपाबाबत एकत्र बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. यामध्ये काँग्रेसने आपली यादी फायनल केल्यानंतर राष्ट्रवादीला सोडणार्‍या एका जागेचा विचार करायचा असे समजत आहे.

पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रीमंडळात जर काँग्रेसला 23 मंत्रीपद मिळाली, तर आता अस्तित्वात असलेला फॉर्म्युला कायम ठेऊन राष्ट्रवादीसाठी काँग्रेसने स्वत:कडे असलेली तीन ते चार महामंडळ सोडायची अशी मागणी केल्याचे समजत आहे. आणि जर ही महामंडळं काँग्रेस सोडणार नसेल तर 21-22 हा फॉर्म्युला मान्य करायचा. अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याची समजत आहे.

कोणाकोणाला लॉटरी लागणार?

- सतेज पाटील – संजय देवतळे, वरोरा- चंद्रकांत हंडोरे, चेंबूर- वसंत पुरके, राळेगाव- प्रशांत ठाकूर, पनवेल- अमित देशमुख, लातूर- बसवराज पाटील, औसा- यशोमती ठाकूर, तिवसा- कल्याण काळे, फुलंब्री

या कॅबिनेट मंत्र्याचा पत्ता कापला जाणार ?

सुभाष झनक नसीम खान नितीन राऊत शिवाजीराव मोघे विजय वडेट्टीवार

या राज्यमंत्र्याचा पत्ता कापला जाणार ?

अब्दुल सत्तार रमेश बागवे

close