सरकारी भूखंड प्रकरणी येदियुरप्पा अडचणीत

November 17, 2010 6:05 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर

देशात स्पेक्ट्रम घोटाळा गाजत असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा जमीन घोटाळ्यात अडकले आहे. मुख्यमंत्रीच घोटाळ्यात अडकल्याने विरोधकांना त्यांच्याविरुद्ध रान उठवण्याची आयती संधी चालून आली. विशेष म्हणजे येदियुरप्पा यांच्याबरोबरच भाजपमधल्या काही नेत्यांनाही याचा फायदा मिळला आहे.

दक्षिणेत भाजपचे सत्ता असलेले राज्य घोटाळ्यांच्या मुद्यांमुळे चांगलंच अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री येदियुराप्पा जमीन घोटाळ्याप्रकरणी चर्चेत आले. आता हाच मुद्दा धरुन काँग्रेस त्यांच्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत आहे.

जमीन घोटाळ्यांच्या साखळीत येदियुराप्पा यांचे कुटुंबिय कसे सहभागी आहेत यावरुन काँग्रेस आणि एचडी देवेगौडा यांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आणि गैरकारभाराचे आरोप होत असताना येदियुराप्पा यांनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली.

close