पंतप्रधानांनी खुलासा द्यावा- अडवाणी

November 17, 2010 6:07 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली आहे. सरकारने स्पष्टीकरण दिल्याशिवाय संसदेमधली कोंडी सुटणार नाही असंही ते म्हणाले.

विरोधकांनी जरी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असं डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. डॉ. स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरुनच काल सुप्रीम कोर्टाने पंतप्रधानांना फटकारले होते.

ज्या विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली ते एक षडयंत्र आहे. स्पेक्ट्रम वाटपाचा ज्यांना कुणाला फायदा झाला किंवा यासगळ्यात ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यांनी खरं राजीनामा देण्याची गरज असं डॉ.स्वामी यांनी स्पष्ट केले.

close