सायनाची क्वार्टर फायनलमध्ये धडक

November 17, 2010 6:19 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालनेही अपेक्षेप्रमाणे क्वार्टर फायनल गाठली. पहिल्या राऊंडमध्ये तिला बाय मिळाला होता. त्यामुळे सिंगल्समधली आपली पहिली मॅच खेळताना सायनाने लिडिया चेहला फारशी संधीच दिली नाही. फक्त 28 मिनिटात सायनाने ही मॅच जिंकली. 21-15, 21-17 ने तिने ही मॅच जिंकली.

नेमबाजांकडून निराशा

कॉमनवेल्थमध्ये झालेल्या जबरदस्त कामगिरीनंतर आशियाई स्पर्धेतही भारतीय शुटर्स अशीच कामगिरी करतील अशी आशा सगळे बाळगुन होते. पण आत्तापर्यंत मात्र त्यांची कामगिरी निराशाजनकच झाली आहे. एशियन गेम्स स्पर्धेत आज सलग तिसर्‍या दिवशी भारतीय नेमबाजांनी निराशा केली.

समरेश जंग, गगन नारंग, तेजस्विनी सावंत या स्टार नेमबाजांना मेडलच्या आसपासही जाता आल नाही. 25 मीटर स्टँडर्ड पिस्टलमध्ये समरेश जंग सातव्या क्रमांकावर राहिला. त्याला 600 पैकी 569 पॉइंट्स मिळवता आले. टीम प्रकारात समरेश, पेंबा तमंग आणि चंद्रशेखर चौधरी यांची टीम चौथी आली.

चंद्रशेखर चौधरीला एका राऊंडमध्ये 100 पैकी फक्त 82 पॉइंट्स मिळवता आले. त्या राऊंडचा फटका भारतीय टीमला बसला. तर महिलांच्या 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात तेजस्विनी सावंत 23 व्या क्रमांकावर फेकली गेली. याच प्रकारात लज्जा गोस्वामी 24 वी आली. टीम प्रकारात तर भारतीय टीमला इराण, मंगोलिया या टीमनेही मागे टाकलं. भारतीय टीम नववी आली.

वुशु खेळात सिल्व्हर मेडल

एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात 5 व्या सिल्व्हर मेडलची नोंद झाली. वुशू या खेळात भारताच्या संध्याराणीने सिल्व्हर मेडलची कमाई केली. 60 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये इराणच्या खादीज अझादपोरने तिचा एकतर्फी पराभव केला. काल पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात बिमोलजित सिंगने वुशूमध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिल होते.

close