काँग्रेसच्या यादीला दिल्लीतून खो

November 18, 2010 9:19 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी होणार असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते मात्र आज मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अखेर निश्चित झाल्याचे जाहीर केले. यादी तयार करताना कटू निर्णय घ्यावे लागल्याचंही त्यांनी सांगितले. पण असं असलं तरी यादी मात्र त्यांनी जाहीर केली नाही.

ही यादी मुंबईमध्ये माझ्या सहकार्‍यांसोबतच जाहीर करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ही यादी निश्चित करण्यात आली.

दिल्लीमधले काम पूर्ण झाले आणि आता आपण मुंबईसाठी निघत असल्याने खर्‍या अर्थाने आता दिल्लीचा निरोप घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याचसोबत आदर्श घोटाळ्याचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी आपण सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असून राज्यामध्ये कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

close