टू-जी सेक्ट्रम प्रकरणी पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी – गडकरी

November 18, 2010 9:55 AM0 commentsViews: 2

18 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ आणि टू-जी सेक्ट्रम प्रकरणात पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारी घ्यावी अशी मागणी भाजपाध्यक्ष नितिन गडकरी यांनी केली. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

टू-जी सेक्ट्रम हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारभारतीच्या प्रमुखांना का वाचवण्यात येत आहे असा सवाल नितीन गडकरी यांनी केला.त्याचबरोबर राहुल गांधींचे सल्लागार कनिष्कसिंग यांच्यावरही त्यांनी आरोप केले. कनिष्कसिंग यांच्या नातेवाईकांना या व्यवहारात फायदा मिळाला असा आरोपही त्यांनी केला.

close