वीरधवलला सरकारकडून पाच लाखांच बक्षीस

November 18, 2010 10:07 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी आज बक्षिसांचीही घोषणा केली. चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेनं 50 मीटर बटरफ्लाय स्वीमिंग प्रकारात ब्राँझ मेडलची कमाई केली.

त्यामुळे विरधवलला सरकारतर्फे 5 लाखांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही घोषणा केली. तब्बल 24 वर्षांनंतर भारताला आशियाई स्पर्धेत स्वीमिंगमध्ये मेडल मिळालं आहे.

close