टू -जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फतच व्हावी

November 18, 2010 10:58 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून गदारोळ केल्यानं आजही लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज 11 वाजता सुरू झालं. पण विरोधकांच्या गोंधळामुळे 12 वाजेपर्यंत ते स्थगित झालं होतं.

मात्र 12 वाजताही विरोधकांच्या घोषणा आणि गदारोळ सुरूच राहिला.त्यामुळे 12 वाजल्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.2 जी स्पेक्ट्रम प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फतच व्हावी ही विरोधकांची मागणी कायम आहे.

close