राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल – अजित पवार

November 18, 2010 12:36 PM0 commentsViews: 4

18 नोव्हेंबर

महाराष्ट्र राज्य 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली.

राजकीय जीवनात महत्त्वाचं पद मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते असं सांगत उपमुख्यमंत्रीपदासाठी आपण इच्छुक होतो हेसुद्धा अजित पवार यांनी मान्य केले. त्याचबरोबर लोकांना रिझल्ट्स देता आले पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,यांच्याशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. आयबीएन-लोकमतचे संपादकनिखिल वागळे यानी ही मुलाखत तुम्ही पाहू शकता आज रात्री साडे आठ वाजता फक्त आयबीएन लोकमतवर…

close