महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

November 18, 2010 11:57 AM0 commentsViews: 9

18 नोव्हेंबर

पुण्यात सध्या नाल्यांमधील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे. पण वानवडीमधल्या प्लेझंट पार्क सोसयटीमध्ये नाल्याच्या ग्रीन झोनमध्येच महानगरपालिकेनं बांधकामाला परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. हे बांधकाम अनधिकृत असून ते पाडून टाकावे असा अहवाल उपविभागीय अधिकार्‍यांनी सादर केला आहे. त्यामुळे महानगरपालिका आता हे बांधकाम पाडणार का असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहे.

नाल्याच्या कडेच्या ग्रीनझोन मध्ये बंगला बांधण्यात आला आहे.सोसायटी मेंबर्सनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागपत्रात हे स्पष्ट झालं आहे.महानगरपालिकेनं मंजुर केलेल्या सोसायटीच्या प्लॅनमध्ये या जागेवर पाकीर्ंग बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

याविरोधात सोसायटीतल्या काही लोकांनी एकत्र येत विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्या कडे दाद मागितल्यावर त्यांनी चौकशीचे आदेश दिले. उपविभागीय अधिकारी जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. यासमितीने दिलेल्या अहवालात हे बांधकाम अनधिकृत असून ते पाडून टाकावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण आता या बंगल्यावर खरंच कारवाई होणार का असा सवाल इथले नागरिक करत आहे.

close