देशाचं विभाजन फुटीरवादी संघटनाना हवंय – पंतप्रधान

October 30, 2008 12:06 PM0 commentsViews: 4

30 ऑक्टोबर, नांदेडगुरु-ता-गद्दीच्या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग नांदेड दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होत असलेल्या घटनांचा उल्लेख न करता पंतप्रधान म्हणाले, फुटीरवादी संघटना देशाचं विभाजन करू इच्छित आहे. फुटीरवादी संघटना आपल्या इराद्यात यशस्वी होत असून देशाची एकता भंग करुन लोकांना एकमेकांशी लढायला या संघटना प्रवृत्त करत आहेत '. पंतप्रधानांनी भाषणात कोणत्याही संघटनेचं नाव घेतलं नाही. पण, महाराष्ट्रातील उत्तर भारतीय विरोधी आंदोलनाकडं त्यांचा रोख होता. देशाचं नुकसान टाळण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं. त्यापूर्वी पंतप्रधानांनी गुरूद्वाराला भेट देऊन प्रार्थना केली. जो बोलो सो निहाल संत श्री अकालच्या गजरात त्यांनी गुरुद्वाराला सोनेरी तलवार आणि चादर भेट दिली.

close