मंत्र्याचा शपथविधी संपन्न

November 19, 2010 8:37 AM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर

अखेर आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आज एकूण 29 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 19 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात काँग्रेसच्या 14 तर राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे. तर आज दहा राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यात काँग्रेसच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसनं रमेश बागवे, अब्दुल्ल सत्तार आणि विजय वडेट्टीवार या तिघा राज्यमंत्र्यांचा पत्ता कापला आहे. तर मुंबईच्या वर्षा गायकवाड आणि शहाद्याच्या पद्माकर वळवी यांना कॅबिनेटपदी बढती दिली आहे. तर चंद्रपूरच्या संजय देवताळे यांना प्रथमच संधी देताना कॅबिनेट मंत्रिपद दिलं.

काँग्रेसनं आधीच्या मंत्रिमंडळात बदल करताना सहा नव्या चेहर्‍यांना संधी दिली. याबरोबरच काँग्रेसमधले दिग्गज नेते नारायण राणे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील,राजेंद्र दर्डा,बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रवादीनं मात्र आधीच्या मंत्रिमंडळात काही बदल केलेले नाहीत. राष्ट्रवादीच्या बबनराव पाचपुते, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, राजेश टोपे आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले आम्ही आमचं काम केलं आता तुम्ही विश्लेषण करा.

close