अखेर ‘आदर्श’ मंत्रिमंडळ तयार

November 19, 2010 11:40 AM0 commentsViews: 14

19 नोव्हेंबर

आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला आज एकूण 29 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 19 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात काँग्रेसच्या 14 तर राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे. तर आज दहा राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यात काँग्रेसच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 5 मंत्र्यांचा समावेश आहे. अखेर काँग्रेसने आपल्या 'आदर्श' मंत्रिमंडळ तयार केले आहेत.त्यानंतर लगेचचं खातेवाटपही जाहीर झालं.

सर्वप्रथम राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी बाहेर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा, अर्थ आणि नियोजन खातं स्वत:कडे ठेवलं. तर स्वत:कडचं जलसंपदा खातं सुनिल तटकरे यांना देऊन त्यांच्याकडचं अर्थ खातं त्यांनी आपल्याकडे ठेवलंय. त्याशिवाय ऊर्जा आणि नियोजन खातं ही त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय नाराज झालेल्या छगन भुजबळ यांना सार्वजनिक बांधकामाशिवाय पर्यटन खात्याचा भारही देण्यात आला. आर.आर.पाटील यांचं गृहमंत्रीपद कायम ठेवण्यात आलं. याशिवाय इतर खात्यांमध्ये राष्ट्रवादीनं फारसे बदल केलेल नाहीत. पण काँग्रेसमध्ये मात्र नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी धक्का दिला. त्यांच्याकडचं महसून खातं काढून घेऊन ते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आलं. राणेंना उद्योग आणि बंदर विकास खातं सोपवण्यात आलं. तर पंतगराव कदम यांना वन तर राधाकृष्ण विखे पाटलांना कृषी खात मिळालं आहे.

काँग्रेसच खातेवाटप -

कॅबिनेट :

पृथ्वीराज चव्हाण – नगरविकास, गृहनिर्माण, सामान्य प्रशासन, परिवहन, मदत व पुर्नवसन, न्याय व विधी, मराठी भाषा, माहिती-जनसंपर्क, खणीकर्म, झोपडपट्टी सुधार, युएलसी, घरदुरूस्ती आणि पुनर्बांधणी, माजी सैनिक कल्याण…

नारायण राणे- उद्योग , बंदरे विकास, रोजगार व स्वयंरोजगारपतंगराव कदम – वने, पुनर्वसन व मदतकार्य, भूकंप पुनर्वसनशिवाजीराव मोघे- सामाजिक न्याय, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीय कल्याणराधाकृष्ण विखे पाटील – कृषी आणि पणनहर्षवर्धन पाटील – संसदीय कामकाज आणि सहकारबाळासाहेब थोरात- महसूल आणि खार जमीनराजेंद्र दर्डा – शालेय शिक्षण…मोहम्मद आरिफ (नसीम) खान – वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्यांक सुरेश शेट्टी – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि राजशिष्टाचारनितीन राऊत – जलसंवर्धन, रोजगार हमी योजनामधुकर चव्हाण – पशुसंवर्धन आणि दुग्धविकासपद्माकर वळवी – युवक कल्याण आणि क्रिडावर्षा गायकवाड – महिला आणि बालकल्याणसंजय देवतळे – पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य

राज्यमंत्री -

रणजित कांबळे – पाणीपुरवठा आणि स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, पर्यटन, सार्वजनिक बांधकामसतेज पाटील – गृह (शहर आणि ग्रामीण), ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासनराजेंद्र मुळक – अर्थ, ऊर्जा, नियोजन, संसदीय कामकाज, राज्य उत्पादन शुल्कराजेंद्र गावित – आदिवासी विकास, कामगार, फलोत्पादनडी. पी. सावंत – वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, विशेष सहाय्य

राष्ट्रवादीच खातेवाटप –

कॅबिनेट

अजित पवार – उपमुख्यमंत्री – उर्जा, अर्थ व नियोजन…छगन भुजबळ – सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आर. आर. पाटील – गृह जयंत पाटील – ग्रामविकासगणेश नाईक – उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जालक्ष्मण ढोबळे – पाणीपुरवठा आणि स्वच्छताअनिल देशमुख – अन्न व नागरी पुरवठाजयदत्त क्षीरसागर – रस्ते विकास महामंडळमनोहर नाईक – अन्न व औषध प्रशासनविजयकुमार गावीत – वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादनसुनील तटकरे – जलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)रामराजे निंबाळकर – जलसंपदा (कृष्णा खोरे)बबनराव पाचपुते – आदिवासी विकासराजेश टोपे – उच्च आणि तंत्रशिक्षण हसन मुश्रीफ – कामगार आणि विशेष सहाय्य

राज्यमंत्री –

भास्कर जाधव – नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन संसदीय कामकाज, क्रीडा आणि युुवक कल्याण, न्याय व विधी, माजी सैनिक कल्याण,

प्रकाश सोळंखे – महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्य,भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगसचिन अहिर – गृहनिर्माण, झोडपडपट्टी सुधार, युएलसी, उद्योग, खाणी, सामाजिक न्याय, पर्यावरण, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीय कल्याणफौजिया खान – सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राज्यशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, औकाफगुलाबराव देवकर – कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य उत्पादन, जलसंवर्धन, रोहयो, रोजगार व स्वयंरोजगार आणि परिवहन

close