मराठी डॉक्टर आणि बिहारी पेशंटचं भावनिक नातं

October 30, 2008 1:03 PM0 commentsViews: 4

30 ऑक्टोबर, पुणेजेमिमा रोहेकरउत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद राजकीय नेते रंगवत असताना पुण्यातील एका महिला डॉक्टरनं माणुसकीला भौगोलिक किंवा राजकीय मर्यादा नसतात, हे सिद्ध केलं. बिहारमध्ये पुरपरिस्थितीच्यावेळी महाराष्ट्रातून गेलेल्या डॉक्टरांच्या पथकापैकी डॉ. मानसी पळशीकर एक होत्या. पथकात त्या एकमेव महिला डॉक्टर असल्यानं गर्भवती महिलांची त्यांच्याकडे रिघ असायची. याकाळात पेशंट्ससोबत भावनिक नातं तयार झाल्याचं डॉ.मानसी सांगतात.डॉ. मानसी पळशीकर यांच्या मते माणसांची दु:ख आणि सुख यांची जाणीव सगळीकडे सारखीच आहे. बिहारमध्ये पुराच्यावेळी तीन आठवडे त्यांचा मदतकार्यात सहभाग होता. एका डॉक्टरसाठी पेशंट कुठल्या राज्याचा, याला महत्त्व नसतं. महत्त्व असतं, ते त्याच्या वेदना शमवण्याला. मात्र बिहारमध्ये मदतकार्य काम करत असताना महाराष्ट्रात काहीतरी विपरित घडत होतं आणि काही गोष्टी अचानक बदलल्या. ' तिथे मला कोणीतरी सांगितलं की टीव्ही पाहा, तुमची लोकं आमच्या माणसांना मारत आहेत. एका क्षणात मी दुसर्‍या जगाची झाले', असं डॉ.मानसी पळशीकर यांनी सांगितलं. परिस्थिती चिघळली असली तरी त्यात सुधारणा होईल आणि दुभंगलेली मनं एकत्र येतील, असा विश्वास डॉ.मानसी यांनी वाटतोय. माणसांच्या नावानं राजकारण करणार्‍या राजकीय नेत्यांना यातून काहीतरी शिकण्याची गरज आहे.

close