नॅनो आता मॉल मध्ये दिसणार

November 19, 2010 7:11 AM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

ज्यांच्यासाठी नॅनो बनवण्यात आली त्या लोकांपर्यंत अजूनही पोहोचली नाही, म्हणूनच आता नॅनो मॉल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. टाटांच्या मॉल्समधून ती आता उपलब्ध असणार आहे अशी माहिती गिरीष वाघ यांनी आज दिली. पुण्यामध्ये आज नॅनोची कहाणी सांगणार्‍या स्मॉल वंडर..नॅनो या पुस्तकाचं प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. नॅनो बनवताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात या सगळ्यामध्ये पुण्याच्या गिरीष वाघ यांचा मोठा वाटा होता.

close