सिब्बल यांचाकडून पंतप्रधानांच्या भूमिकेच समर्थन

November 19, 2010 5:28 PM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर

स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी इतके दिवस टीकेचा भडीमार सहन करणार्‍या काँग्रेसने आज पंतप्रधानांची जोरदार पाठराखण केली. सुब्रमण्यम स्वामी हे राजकीय फायद्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी तर सरकारने फेटाळली. पण आता याप्रकरणात पक्षाची प्रतिमा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे स्पीन डॉक्टर्स जोरदार काम करत आहेत.

स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन विरोधक सरकार आणि पंतप्रधानांना लक्ष्य करत असताना आता त्यांची पाठराखण करण्यासाठी या गदारोळात आज पहिल्यांदा राहुल गांधींनी उडी घेतली. यात पंतप्रधानांची काही चूक नाही, असं राहुल गांधी म्हणत आहे. तर नव्यानंच दूरसंचार खात्याचा अतिरिक्त पदभार स्वीकारलेल्या कपिल सिब्बल यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्यावरच प्रतिहल्ला चढवला. केवळ राजकीय स्वार्थापोटीच डॉ. स्वामी हे सगळं करत असल्याचा टोला सिब्बल यांनी हाणला.

या सगळ्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर शरमेनं मान खाली घालाव्या लागलेल्या काँग्रेसनं आता प्रतिहल्ला करायला सुरुवात केली. याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी त्यांनी फेटाळली.

माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या काम करण्याच्या बेफिकीर वृत्तीमुळे पंतप्रधानांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले. युपीए स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याच्या सोनियांच्या घोषणेलाही यामुळे हरताळ फासला गेला. यासगळ्या प्रकरणावर आज सोनिया गांधी पहिल्यांदाच बोलल्या त्यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.

close